Thursday, September 26, 2019

तोचि खरा असशी ब्राम्हण...


नाही रुढी परंपरेचा बांधील!
देति नव परंपरा काढून जुन्या मोडीत!
तेचि  टिळक फुले अन शाहूराजे असती ब्राम्हण!

अससि जो निशपृह अटळ आणि निर्भीड!
रघुनाथाला  ज्यांनी  नाही  सोडिले !
तेचि  रामशास्त्री असती ब्राम्हण!

धैर्य  शील अन  शौर्य  ज्यांच्या ठायी!
मूठभर मावळ्या संगे लढवली खिंड!
तेचि  बाजीप्रभू  असती ब्राम्हण!

असुनी टाकलेल्या संन्यासाचे पोर !
दिली सामान्यांच्या हाती ज्ञानाची दोर !
तेचि ज्ञानेश्वर असती ब्राम्हण !

पैठणचे पंडित पसरवी थोतांड!
टाकिले ज्ञानीया वाळीत !
ते कैसे असती  ब्राम्हण !

असता अमाप प्रसिद्धीची हाव !
करता दुसऱ्या कामात लुडबुड !
ते कैसे होतील कर्म ब्राम्हण !

देता दुसऱ्यांना अन आई-बापा दूषण !
घेता दुसऱ्यांच्या कामाचे भूषण !
ते कैसे होती कर्म ब्राम्हण !

ज्याला नाही प्रसिद्धीचा सोस !
दाखवी वाट जना होऊन दीपस्तंम्ब !
तोचि खरा असशी कर्म ब्राम्हण !

भेदून मायेचे घोर अंधार !
दाखवी जना सत्याचा सागर !
तोचि खरा असशी ब्राम्हण !


- शिरीष घाटगे 

No comments:

Post a Comment