Sunday, December 16, 2012

अभंग!

कुठवर पोहशील तू स्वबला !
थांबलासी गुरु घेवूनी दिव्याघरा!!

काय म्हणुनि पकडून बसलास नामाशी !
असल भाव गळुनी चालला हातांनी !!

का असशी तू कमळ पत्र ! 
ज्ञान गंगेत राहुनि ज्ञान वंचित !!
तुझ अपेक्षा बरे ते वस्त्र !!!
जे धोबीण धुलाविते घाटात !!!!

काय करता हे माय बापांनो!
देतासि शरीरासी हाड सांगाडा !!
किंतू आपल्या बाल मना !!!
नाही देतासि संस्कार सांगाडा !!!!

कराया जाशी जग परिवर्तन!
होशिल तू त्रिलोक भिकारी !!
करशी स्व-मन परिवर्तन!!!
होशील तू त्रिकाळ स्वामी !!!!

कशास ठरवसी खरे आणि खोटे!
मीच असशी व्यसनात अन व्यसनपरी!!
संसारा असावे अलिप्त दोहांशी!!!
गत असती कमळ पुष्प गंगेत अन चिखलात !!!!

देता दुध योग्यास !
घेईल आस्वाद मनसोक्त!!
देता दुध शहाण्यास !!!
बनवील पेढा तूप लोणी !!!!
देता दुध मुर्खास V
पाहील टाकून मीठ लिंबू V!

लागता पाठीशी संसार मृगजळा!
जाणता स्वताला गावशी  ब्रम्हांडा!!